Shetkari Madat Package: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झालेल्यांसाठी राज्य सरकारने ₹३१,६२८ कोटींचे भरीव मदत पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून, दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त भरपाईचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदतीचे निकष (पीक नुकसानीसाठी)
शेतकऱ्यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि त्यांच्या जमिनीच्या प्रकारानुसार हेक्टरी मदतीचे दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:
प्रकार | हेक्टरी मदतीची रक्कम (प्रति हेक्टर) |
कोरडवाहू शेतकरी | ₹१८,५०० |
हंगामी बागायतदार शेतकरी | ₹२७,००० |
बागायती शेतकरी | ₹३२,५०० |
पीक विमाधारक शेतकरी | ₹१७,००० (विम्यातून) |
बियाणे आणि इतर कामांसाठी अतिरिक्त | ₹१०,००० |
इतर मालमत्ता आणि नुकसानीसाठी विशेष मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ पिकांसाठीच नव्हे, तर इतर मालमत्ता आणि नुकसानीसाठी देखील विशेष मदतीची घोषणा केली आहे:
१. जनावरांसाठी मदत
- दुधाळ जनावरे: दुधाळ जनावरांच्या नुकसानीसाठी प्रति जनावर ₹३७,५०० ची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अट रद्द: मदत देण्यासाठी पूर्वीची ‘३ जनावरांची अट’ रद्द करण्यात आली आहे. जेवढी जनावरे दगावली आहेत, तेवढ्या जनावरांसाठी मदत दिली जाईल.
२. जमीन आणि विहिरींचे नुकसान
- खरडून गेलेली जमीन: खरडून गेलेल्या जमिनीसाठी ₹४७,००० प्रति हेक्टर रोख स्वरूपात मदत दिली जाईल. याव्यतिरिक्त नरेगा (NREGA) माध्यमातून प्रति हेक्टर ₹३ लाख रुपयांची मदत दुरुस्तीसाठी देणार आहोत.
- गाळलेल्या विहिरी: ज्या विहिरींमध्ये गाळ साचला आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ₹३०,००० प्रति विहीर भरपाई दिली जाणार आहे.
३. घरे, दुकाने आणि पायाभूत सुविधा
- घरांची पडझड: घरांची पडझड झाली, तिथे नवीन घरे उभारली जातील.
- दुकानदार: ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे, त्यांना ₹५०,००० पर्यंतची मदत केली जाणार आहे.
- पायाभूत सुविधा: पायाभूत सुविधांचे (Infrastructure) जिथे नुकसान झाले आहे, त्यासाठी ₹१०,००० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत केली जाणार आहे.